नमस्कार मी सुयोग आवळे 🙏🏻
ग्राफिक्स डिझाइनच्या ८ वर्षांच्या अनुभवासह अनेक उद्योग आणि कंपन्यांसोबत मी काम करत आहे. १ मे २०२० रोजी आम्ही ‘आर्टफिना मराठी’ हे चॅनल सुरू केलं. सविस्तर सोप्या मराठी भाषेतून ग्राफिक्स डिझायनिंग शिकवणारं पहिलं युट्यूब चॅनल म्हणून आर्टफिना मराठीचा आम्हाला अभिमान आहे. 😎
आपलं कुटुंब युट्यूबवर २७.८ हजारापेक्षा तर इन्स्टाग्रामवर ५.५ हजारापेक्षा जास्त आहे. कमीत कमी वेळात आणि आपल्या सोप्या मराठीतून ग्राफिक्स डिझायनिंग शिकवणं हे आमचं कौशल्य आहे. आतापर्यंत अनेकांना या विषयांत माहिती मिळवून देण्याचं काम आम्ही केलं आहेच सोबतच या क्षेत्रात अनेकांना आर्थिक सक्षम कसं करता येईल, हे आमचं अंतिम ध्येय आहे.
ग्राफिक्सच्या क्षेत्रात जगभर सुरू असलेल्या घडामोंडींकडे लक्ष देत, येणारे नवी ट्रेंड, टूल आणि तंत्रज्ञान लवकरात लवकर आत्मसात करण्यासाठी आपली टीम कायम प्रयत्नशीर असते.
